ब्रिटिश काळात कोल्हापूर हे संस्थान असल्यामुळे तेथील जनतेला जबाबदार राज्यपद्धतीचा हक्क नव्हता.
या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी १५ फेब्रुवारी १९३८ रोजी प्रजापरिषदेची स्थापना करण्यात आली आणि रत्नाप्पा कुंभार या चळवळीत अग्रभागी उतरले.
कोल्हापूर संस्थानातील प्रजापरिषद चळवळीचे नेतृत्व ते भूमिगत राहून चालवलेले "चले जाव" आंदोलन, कारावास व त्यागाने भरलेला काळ.
ब्रिटिश काळात कोल्हापूर हे संस्थान असल्यामुळे तेथील जनतेला जबाबदार राज्यपद्धतीचा हक्क नव्हता.
या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी १५ फेब्रुवारी १९३८ रोजी प्रजापरिषदेची स्थापना करण्यात आली आणि रत्नाप्पा कुंभार या चळवळीत अग्रभागी उतरले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना संघटित स्वरूप देत जनआंदोलनाच्या नव्या पर्वाची सुरुवात.
शेतकऱ्यांचे मोठे मोर्चे काढून रत्नाप्पा कुंभार यांनी जनआंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली.
पहिल्या आंदोलनानंतर दुसरा मोठा मोर्चा काढून जनतेच्या प्रश्नांना व्यापक स्वरूप देण्यात आले.
भूमिगत काळ संपल्यानंतर कोल्हापुरातील बिंदू चौकात त्यांना अटक करण्यात आली.
दक्षिण संस्थान प्रजा परिषदेची स्थापना करून संस्थानी राज्यव्यवस्थेविरुद्धचा लढा पुढे नेला.
कोल्हापूर राज्यात जबाबदार राज्यपद्धती व मंत्रिमंडळाची स्थापना झाली.
स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना स्वातंत्र्य सैनिक सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.